Raigad Coast on Alert : अरबी समुद्र खवळला अन् चिंता वाढली, मच्छीमारांच्या नौका किनाऱ्यावरच… IMD कडून इशारा काय?
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने जोरदार वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. सुरक्षेसाठी मुरूड, काशीद, अलिबागसह विविध ठिकाणी तीन नंबरचा लाल बावटा लावण्यात आला आहे. सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्याला लावल्या असून समुद्रात जाणे टाळले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार वारे आणि उंच लाटा उसळण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर मुरूड, काशीद, रेवदंडा, अलिबाग आणि उरण या परिसरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून तीन नंबरचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रातून काढून किनाऱ्याला लावल्या आहेत. मच्छीमार सध्या मासेमारीसाठी समुद्रात जाणे टाळत आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. हा मासेमारीचा हंगाम असला तरी, हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे सर्व बोटी किनाऱ्यावरच थांबलेल्या दिसत आहेत
Published on: Oct 28, 2025 04:17 PM
