New UPI Rules : तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; आता 1 ऑगस्टपासून….

New UPI Rules : तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; आता 1 ऑगस्टपासून….

| Updated on: Jul 20, 2025 | 10:52 AM

जर तुम्ही दररोज फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारखे यूपीआय अ‍ॅप्स वापरत असाल तर १ ऑगस्ट २०२५ पासून तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले जाणार आहेत.

तुम्ही दररोज फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या यूपीआय अॅप्लिकेशनचा वापर करून मनी ट्रान्सफर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण येत्या १ ऑगस्टपासून फोन पे आणि गुगल पेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आता तुम्हाला कोणत्याही एका अॅप्लिकेशनवरून दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स बॅलन्स चेक करता येणार आहे. तर लिंक्ड बँक अकाऊंट्स चेक करण्यासाठीही आता मर्यादा येणार आहेत. तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसातून फक्त २५ वेळा पाहता येईल. तर नेटफ्लिक्स, एसआयपी सारख्या सेवांसाठी पेमेंट फक्त तीन स्लॉटमध्ये करता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्यवहार प्रणाली जलद आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन डिजिटल बँकिंगवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 20, 2025 10:49 AM