Rajya Sabha election : देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मविआ नेत्यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव, कशाचा दिला प्रस्ताव?

Rajya Sabha election : देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मविआ नेत्यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव, कशाचा दिला प्रस्ताव?

| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 11:35 AM

विधानपरिषदेसाठी पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला या भेटीदरम्यान देण्यात आला आल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

मुंबई : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानपरिषदेसाठी पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला (BJP) या भेटीदरम्यान देण्यात आला आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्या बदल्यात भाजपने आपल्या राज्यसभेचा (Rajya Sabha election) उमेदवार मागे घ्यावा, असा प्रस्ताव देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात छगन भुजबळांच्या नेतृत्वात, अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील या नेत्यां समावेश होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. आता या चर्चेनंतर महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजप स्विकारणार का, हे पहावं लागले. यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

Published on: Jun 03, 2022 11:35 AM