Ambadas Danve : इम्तियाज जलील – उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
Ambadas Danve On Thackeray - Jalil Meeting : एमआयएमचे संभाजीनगरचे माजी खासदार नेते इम्तियाज जलील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. या भेटीच कारण विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.
एमआयएमचे संभाजीनगरचे माजी खासदार नेते इम्तियाज जलील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यांच्या या भेतीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अद्यापही या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र आता एकीकडे राजकीय चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावर भाष्य करत इम्तियाज जलील मातोश्रीवर जाण्याचं कारण सांगितलं आहे.
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील यांच्या मुलाचं लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे आणि इम्तियाज जलील यांच्या मुलाची देखील थोडीफार ओळख आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नात त्यांना आमंत्रण देण्यासाठी जलील मातोश्रीवर गेले असतील, असं अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 11, 2025 04:16 PM
