Aryan Khan | आर्यन खानला 30 ऑक्टोबरपर्यत न्यायालयीन कोठडी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपण्याचं नाव घेईनात. आर्यन खानचा जामीन पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीये. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठती 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये.
