Supriya Sule | पुण्यात पुढच्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा – सुप्रिया सुळे

| Updated on: Oct 31, 2021 | 6:06 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला आता सुरुवात झालीय. पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नेते कामाला लागल्याचं दिसून येत आहे. बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरु झालंय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केलीय.

Follow us on

राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला आता सुरुवात झालीय. पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नेते कामाला लागल्याचं दिसून येत आहे. बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरु झालंय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केलीय. पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार. अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नोकरी मेळावा आज पुण्यात घेण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असा आदेशच सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.