JP Singh : …तर पाक सईद-लखवीला का स्वाधीन करू शकत नाही, इस्त्रायलमधील भारताच्या राजदूतांनी पाकिस्तानला खडसावलं
जेपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं कौतुक केले. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की भारताचे ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. अमेरिकेने मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला ज्याप्रमाणे सोपवले होते, त्याचप्रमाणे पाकिस्तानने हाफिज सईद, साजिद मीर आणि झाकीर रहमान लखवी सारख्या वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर दोन्ही देशातील तणाव कमी झालयाचे पाहायला मिळत आहे. अशातच इस्त्रायलमधील भारताचे राजदूत जेपी सिंह यांनी पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. जर अमेरिका दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करू शकते तर पाकिस्तान हाफिज सईद लखवीला का स्वाधीन करू शकत नाही? असा थेट सवाल इस्त्रायलमधील भारताचे राजदूत जेपी सिंह यांनी पाकिस्तानला केला आहे. इस्रायलमधील भारताचे राजदूत जेपी सिंह पुढे असेही म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर फक्त थांबले आहे, ते संपलेले नाही. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी पाकिस्तानकडे हाफिज सईद, लख्वी आणि साजिद मीर सारख्या वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय युती स्थापन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बघा नेमकं काय म्हणाले इस्त्रायलमधील भारताचे राजदूत जेपी सिंह?
Published on: May 20, 2025 03:18 PM
