Operation Sindoor दरम्यान पाकला मोठा चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम; पाकनं केली चूक अन्…
ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तासांच्या युद्धात शौर्य, साहसी युद्धाच्या रोमांचक कथांची उदाहरणे समोर आली. चार दिवस चालणारी ही लढाई वेगवान कृती, तांत्रिक बुद्धिमत्ता आणि शत्रूला मागे टाकण्याची कहाणी आहे.
भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडून पाकिस्तानला मोठा चकवा देण्यात आल्याची एक माहिती समोर आली आहे. ऑपरेश सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारताने डमी एअर क्राफ्टचा वापर केल्याचे समोर आले आहे. या डमी एअर क्राफ्टमुळे पाकिस्तानच्या एअर डिफेन्स आणि वायू सेनेला मोठा चकवा देण्यात आला. सुखोई-३० आणि मिग २९ यासारखी भारताने डमी एअर क्राफ्ट ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरली आणि या डमी एअर क्राफ्ट विमानांच्या चकव्यानंतर भारताने पाकिस्तानचे ११ तळ उद्धवस्त केलेत.
पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसलेल्या या बनावट भारतीय विमानांना पाकने खरे लढाऊ विमान समजून त्यांची रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केली. भारतीय हवाई दल याचीच वाट पाहत होते. हवाई दलाने पाकिस्तानच्या मौल्यवान क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेचे स्थान शोधून काढले होते. यानंतर, भारताने ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ला सुरू केला आणि पाकिस्तानचा विनाश झाला.
