Boycott Turkey : पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा दणका, नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनसह कुणी घातला बहिष्कार?

Boycott Turkey : पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा दणका, नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनसह कुणी घातला बहिष्कार?

| Updated on: May 17, 2025 | 12:16 PM

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला मदतीचा हात पुढे करणं तुर्की देशाच्या चांगलंच आगांशी आलं आहे. तणावादरम्यान पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिलाय.

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनवर तुर्कीश शो बंद करण्यात आलेत. तर व्यापारी, पर्यटक आणि विद्यापीठांनीही तुर्कीवर बहिष्कार घातला आहे. यासह भारत सरकारने विमानतळांवरच्या सुविधासह सेलेबी या तुर्कीश कंपनीला दिलेलं विमानतळाचं कंत्राट रद्द केलं असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कंत्राट कॅन्सल केल्याचे भारत सरकारने म्हटलं आहे. देशातील ९ विमानतळावर सेलेबी या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर तुर्कीतून आयात होणाऱ्या सफरचंदावर भारतीय व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलाय. तर जेएनयू, जामिया मिलिया आणि मौलाना आझाद या विद्यापीठांकडून तुर्कीवर बहिष्कार टाकत शैक्षणिक करार रद्द केलेत. केसरी टूर्सकडून तुर्कीच्या सर्व टूर बंद केल्या आहेत. त्यामुळे तुर्कीला हा मोठा दणका भारताकडून देण्यात आल्यानंतर तुर्कीचं मोठं नुकसान होत असल्याचे दिसतंय.

Published on: May 17, 2025 12:16 PM