Mock Drills : उद्या देशव्यापी मॉक ड्रिल, महाराष्ट्रात कुठे ब्लॅकआऊट अन् कुठे वाजणार सायरन? बघा तुमचा जिल्हा आहे का?

Mock Drills : उद्या देशव्यापी मॉक ड्रिल, महाराष्ट्रात कुठे ब्लॅकआऊट अन् कुठे वाजणार सायरन? बघा तुमचा जिल्हा आहे का?

| Updated on: May 06, 2025 | 12:53 PM

गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सुरक्षा मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहे. देशातील एकूण २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या २४४ जिल्ह्यात मॉक ड्रिलची केंद्र सरकारची योजना आहे. हे जिल्हे भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेले असून यामध्ये जम्मू कश्मीर, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात. यापैकी महाराष्ट्र राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, उरण, तारापूरसह अलिबाग, रोहा, पुणे, पिंपरीमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. तर औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील मॉक ड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीतून स्वतःचा बचाव करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सायरन वाजल्यावर हे करा

तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं.

5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.

सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.

फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.

घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे थांबा.

संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल अशा ठिकाणी लपा.

टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.

अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.

Published on: May 06, 2025 12:47 PM