Pahalgam Attack : पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन अन्…

Pahalgam Attack : पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन अन्…

| Updated on: May 01, 2025 | 5:11 PM

नुकतीच 29-30 एप्रिल नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांकडून गोळीबार झाला. 30 एप्रिल आणि 1 मे पाकिस्तानी चौक्यांकडून कुपवाडा, उरी आणि अखनूर भागातील गोळीबाराच्या घटना घडल्या.

पाकिस्तानच्या कुरापती एलओसीवर अजून थांबायचं नाव घेत नाहीये. पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी सुद्धा शस्त्रसंघीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंघीचं उल्लंघन झाल्याची माहिती आहे. कुपवाडा, उरी आणि अखनूर या भागांमध्ये गोळीबारची पुन्हा एकदा घटना घडली आहे. पाकच्या गोळीबाराला भारताकडून सुद्धा जशासं तसं उत्तर देण्यात आलंय.

कृष्णा घाटी सेक्टरमध्ये 1 एप्रिल रोजी सुरुंग स्फोट, गोळीबार करण्यात आला. तर घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत करण्यात आली. 22-23 एप्रिल पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर आणि पुंछमध्ये गोळीबार झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. 24-25 एप्रिल कुपवाडातील लीपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झाला. 25-26 एप्रिल पाकिस्तानी सैन्याकडून एलओसी वरील विविध 34 क्षेत्रांमध्ये गोळीबार करण्यात आला. 26-27 एप्रिल उत्तर काश्मीरमधील कुपवाडा लीपा सेक्टरमध्ये गोळीबार कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Published on: May 01, 2025 05:11 PM