Pakistan BIG Decision : पाकच्या उलट्या बोंबा… भारताविरोधात पाकिस्तानं घेतले ‘हे’ मोठे निर्णय
भारत सरकारच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानकडून देखील आता थयथयाट सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने गोची करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्तानकडून देखील भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पाकिस्तानकरता सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा भारताने निर्णय घेतल्या नंतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देत काही निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानकडून भाराताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद
भारतासोबतच्या व्यापारावर पाकिस्तानकडून बंदी घातली
पाकिस्तानात असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30 एप्रिलपर्यंत भारतात परतावं
पाकिस्तानने त्यांचे हवाईक्षेत्र भारतासाठी केले बंद
