Mock Drill : भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष; जागतिक दक्षता वाढली

Mock Drill : भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष; जागतिक दक्षता वाढली

| Updated on: May 06, 2025 | 11:40 AM

गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात आता मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर उद्या 7 मे रोजी संरक्षण सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे हे निर्देश देण्यात आलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे ही आदेश आहेत.

भारतात उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या देशव्यापी मॉक ड्रिल संदर्भात गृहसचिवांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक सुरू झाली असून बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यांचे मुख्य सचिव हजर आहेत. यासह NDRF आणि SDRF च्या अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती या बैठकीला असणार आहे. तर दुसरीकडे राज्यात दहा ठिकाणी सिव्हील नागरी सुरक्षा विभागाकडून मॉक ड्रिलची तयारी करण्यात आली आहे. समुद्र किनारी चार तर शहरात सहा पथकं मॉक ड्रिल सादर करणार आहे. मुंबई जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. तर या बैठकीत तीन सत्रात मॉक ड्रिल घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

Published on: May 06, 2025 11:40 AM