India vs Pakistan War : सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
India - Pakistan War Updates : पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये काल रात्री हल्ला करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात काही घरांचं नुकसान झालं आहे.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सीमेवरील घरांचं नुकसान झालं आहे. सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी शेलींगचे तुकडे आढळलेले आहेत. पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जातं आहे. मात्र भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या या हल्ल्यांना चांगलच प्रत्युत्तर मिळत आहे. त्यामुळे आधीच कर्जाने कंगाल झालेल्या पाकिस्तानचे हालबेहाल झालेले आहेत. सीमावर्ती भागात असलेल्या पुंछ, राजोरी यासारख्या भागात पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्याने येथील घरांचं, वाहनांचं देखील नुकसान झालं आहे.
दरम्यान, रात्री भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 3 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झाल्या असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जात आहे.
Published on: May 09, 2025 09:20 AM
