Pakistan Drone Attack : पाकिस्तानचा मिसाईल हल्ला,  राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून चुकेल काळजा ठोका

Pakistan Drone Attack : पाकिस्तानचा मिसाईल हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून चुकेल काळजा ठोका

| Updated on: May 10, 2025 | 9:59 AM

पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्यात राजौरीमधील अनेक भागात तोफगोळे फेकण्यात आले. यानंतर राजौरीमधील अनेक भाग हा या स्फोटांच्या आवाजाने हादरून गेल्याचे पाहायला मिळतय. याचे विदारक फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहे.

भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. पाकिस्तानमध्ये अद्याप युद्धाची खुमखुमी असल्याचे दिसतेय. पाकिस्तान सतत भारतीय निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहे. गुरुवारी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि आसपासच्या भागात पाकिस्तानशी चकमक सुरूच आहे. पाकिस्तानने जम्मू येथील पठाणकोट येथील श्रीनगर येथील हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागली. यावेळी स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले उधळून लावले आहेत. प्रत्युत्तराच्या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी राजौरी, पूंछ आणि जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्यात राजौरी शहरातील सामान्य नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळतंय. पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्यासह ड्रोनने केलेल्या हल्ल्यात राजौरीमधील घरांचे, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे विदारक दृश्य आता समोर आलेले आहे.

Published on: May 10, 2025 09:59 AM