Shahbaz Sharif  : भारताच्या करारा जवाबानं पाक पंतप्रधान भेदरला, भारताला सांगा… जगभरातील देशांपुढे पसरले हात अन् एकच विनंती

Shahbaz Sharif : भारताच्या करारा जवाबानं पाक पंतप्रधान भेदरला, भारताला सांगा… जगभरातील देशांपुढे पसरले हात अन् एकच विनंती

| Updated on: May 09, 2025 | 10:01 AM

भारताने लष्करी तळं टार्गेट करण्याचा प्रयत्न सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र भारताकडून केवळ प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जात आहे. अशातच भारताकडून देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तरानंतर भारताला कारवाई थांबवायला सांगा, अशी विनवणी पाककडून जगाला केली जात आहे.

पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने देखील प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेलगतच्या भारताच्या १६ शहरांवर हल्ला करण्याचा डाव आखला मात्र हा पाकचा प्रयत्न भारताने उधळून लावला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी शेकडो ड्रोन नष्ट केले यासह अनेक मिसाईलही जमीनदोस्त केलेत. यानंतर भारताला धमकावणारा पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफ भारताच्या या करारा जवाबाला चांगलाच घाबरल्याचे पाहायला मिळतंय. अशातच घाबरलेल्या पाकच्या पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला आहे. भारताकडून देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलंय आणि भारताला सांगा कारवाई थांबवा…अशी विनवणीच पाकिस्तान अनेक देशांना करतांना दिसतोय. भारताकडून कारवाई थांबवण्यात यावी यासाठी पाकिस्तान जगभरातील देशापुढे हात पसरतांना दिसतोय.

Published on: May 09, 2025 10:01 AM