YouTube ban India : देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश

YouTube ban India : देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश

| Updated on: Apr 29, 2025 | 1:39 PM

केंद्र सरकारने देशातले काही यूट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत. काल पाकिस्तानच्या काही चॅनलवर ही कारवाई केल्यानंतर अजून काही चॅनलवर बंदी घालण्यात आलेली आहे.

भारतातील काही यूट्यूब चॅनल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर काल कारवाई केल्यानंतर ही आणखी एक कारवाई केंद्र सरकारने केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णय घेतले होते. त्यानंतर काल पाकिस्तानच्या काही यूट्यूब चॅनलवर देखील भारत सरकारने बंदी घातली होती. या चॅनलची यादीच सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. यात माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे. त्यानंतर आज देखील काही यूट्यूब चॅनल बंद करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

Published on: Apr 29, 2025 01:39 PM