Breaking | भारतीय कीपर ऋषभ पंतला डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग

Breaking | भारतीय कीपर ऋषभ पंतला डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 2:39 PM

इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC) इंग्लंड विरुद्धचे कसोटी (England Test Series) सामने सुरु होण्यास बराच वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. याचवेळी संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही मागील काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होता.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. त्यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाणार नाही. सुदैवाने संघातील इतर खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचंही समोर येत आहे. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.