Pahalgam Attack : फक्त पाणी रोखल्यानं पाकिस्तानाची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

Pahalgam Attack : फक्त पाणी रोखल्यानं पाकिस्तानाची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

| Updated on: Apr 24, 2025 | 7:55 PM

भारताने इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित केला. सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे नेमकं काय होणार आहे?

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित करण्यात आला. आता करारानुसार सिंधू, चिनाब किंवा झेलम या नद्यांच्या पाण्यावर भारत आता पाकिस्तानचा अधिकार मानणार नाही. या आधीच्या मर्यादित वापरा ऐवजी भारत पूर्ण पाण्यावर अधिकार सांगणार आणि त्याचा वापरही करणार आहे. मात्र तात्काळ नद्यांच पाणी आपल्याला रोखता येणे शक्य होणार नाही. त्याआधी नियोजनानुसार कमी वेळेत काही बांध आणि कालवे उभारून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाणारे पाणी रोखावे किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

आता भारताच्या या वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला दीर्घकालीन गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. पाकिस्तानची सोळा दशलक्ष हेक्टर शेती ही सिंधू करारावर अवलंबून आहे. गहू, तांदूळ, ऊस या पाकिस्तानातील प्रमुख पिकांसाठी हा करार महत्त्वाचा होता. कराची, लाहोर, मुल्तान सारखी मोठी शहर सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाकिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांपैकी ४०% प्रकल्प सिंधू नदीच्या पाण्यावर जगतात. भविष्यात शेतीसह पाणी आणि अन्नधान्या टंचाईचा पाकिस्तानपुढे सर्वात मोठा आव्हान असणार आहे.

Published on: Apr 24, 2025 07:55 PM