नोकरीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक, सायबर पोलीसांचं तरुणांना आवाहन

| Updated on: Mar 24, 2023 | 10:35 AM

रोजगार तरुणांची नोकरी किंवा रोजगाराच्या नावावर फसवणूकी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नागपूर सायबर पोलीसांनी याप्रकरणी तरूणांना सावध करत सल्ला दिला आहे

Follow us on

नागपूर : वाढती महागाई, नोकऱ्यांची कमतरता त्यामुळे सध्या तरूणांच्या हाताला काम नाही. यामुळे राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या लाढताना दिसत आहे. तर याच बेरोजगार तरुणांची नोकरी किंवा रोजगाराच्या नावावर फसवणूकी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नागपूर सायबर पोलीसांनी याप्रकरणी तरूणांना सावध करत सल्ला दिला आहे. यावेळी सायबर सेलच्या पोलीस निरिक्षक कविता इसारकर यांनी तरूणांची कशा पद्धतीने फसवणूक आणि लुबाडणूक होते हे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी अशा टोळ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला बेरोजगार तरुणांना दिलाय.