Rohit Pawar | ED, CBI सारख्या यंत्रणांचा राजकीय स्वार्थासाठी वापरु नये : रोहित पवार

| Updated on: Sep 15, 2021 | 3:15 PM

रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी मनमोकळ्या गप्पा मारत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

Follow us on

रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी मनमोकळ्या गप्पा मारत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी त्यांनी ईडीच्या गैरवापरावरही टीकास्त्र सोडलं. ईडी किंवा सीबीआयचा राजकीय वापर होत असेल तर घातक आहे. नाही तर तो पायंडा पडतो. एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचं असेल तर अशाच यंत्रणाचा वापर केला पाहिजे असं संबंधितांना वाटतं. लोक घाबरतात. कारण त्यात तथ्य नसलं तरी त्या प्रक्रियने त्रास होतो. कुटुंबावर परिणाम होतो. त्यातून काहीच बाहेर येत नाही. सुशांतसिंह प्रकरणात असंच केलं. बिहारच्या निवडणुकीसाठी यंत्रणांचा वापर केला आणि त्यातून बाहेर काय आलं तर आत्महत्याच असल्याचं निष्पन्न झालं. अशा गोष्टीतून राजकीय मनस्तापच होतो. ते थांबलं पाहिजे. बोलायचं तर मूलभूत मुद्दयावर बोलू. राज्य सरकार चुकत असेल तर त्यावर बोलू. याचा दहावा नंबर त्याचा बारावा नंबर यामध्ये गुंतून राहिला तर ईडीवर लोकांचा विश्वास राहणार नाही, असं ते म्हणाले.