INTERNET DOWN | जगभरातील इंटरनेटसेवा ठप्प कशी झाली? Error 503 आहे तरी काय?

INTERNET DOWN | जगभरातील इंटरनेटसेवा ठप्प कशी झाली? Error 503 आहे तरी काय?

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:48 PM

वेबसाईट्स क्रॅश होणाऱ्यांमध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk द गार्जियन, न्यूयॉर्क टाईम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स अशा अनेक लोकप्रिय वेबसाईट्सचा समावेश आहे.

जगभरात इंटरनेट ठप्प झाल्यानं मोठ मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याचं समोर आलंय. वेबसाईट्स क्रॅश होणाऱ्यांमध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk द गार्जियन, न्यूयॉर्क टाईम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स अशा अनेक लोकप्रिय वेबसाईट्सचा समावेश आहे. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडरमुळे इंटरनेट ठप्प झाल्याचं बोललं जातंय. जागतिक माध्यमसंस्था न्यूयॉर्क टाईम्स आणि ब्रिटन सरकारची वेबसाईट देखील क्रॅश झालीय. या वेबसाईट्स लोडच होत नाहीयेत. त्यामुळे वापरकर्त्यांना सातत्याने वेबसाईटवर इरर दिसत आहे.