Vaishnavi Hagawane Case : खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणे बंधूंना IPS मामाकडून शस्त्र परवाना? सुपेकर म्हणाले, मी जबाबदार…

Vaishnavi Hagawane Case : खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणे बंधूंना IPS मामाकडून शस्त्र परवाना? सुपेकर म्हणाले, मी जबाबदार…

| Updated on: May 30, 2025 | 12:56 PM

पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली. मी त्याला जबाबदार नाही, असं सांगण्याचा प्रयत्न हगवणे भावाचे मामा आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी केलाय.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय. अशातच पोलिसांच्या चौकशीतून नव-नवे खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीचा पती शंशाक आणि त्याचा भाऊ सुशील हगवणे या दोघांकडे तीन शस्त्र आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना या शस्त्रांचे परवाने मिळाले आणि शस्त्रास्त्रांचा परवाना देण्यात आले त्या कागदपत्रांवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची स्वाक्षरी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केला होता. जालिंदर सुपेकर हे या दोन्ही हगवणे भावाचे नात्याने मामा लागतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का? असा सवाल केला जात असताना सुपेकरांनी आरोपांवर मौन सौडलं आहे. जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीच्या स्वाक्षरीनंतर आपण फाईलवर स्वाक्षरी केली, असं सुपेकरांच म्हणत टीव्ही 9 मराठीला हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Published on: May 30, 2025 12:49 PM