राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य नाही

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 11:51 PM

महाराष्ट्रात तशी कोणतीही परिस्थिती नाही, त्यामुळे एकाद्या मंत्र्याला अटक झाली, कोणत्याही मंत्र्यावर गुन्हा नोंदवला ही कारणं राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लागू नसतात.

भारतीय संविधानातील 354 नुसार आणीबाणी कशी लावली जाते आणि केव्हा लावली जाते याबद्दल संविधानामध्ये जे सांगितले आहे, त्यामध्ये संविधानानुसार राज्य कारभार चालवण्यास असमर्थ असणे ही कारणं आणीबाणीची असू शकतात असं मत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले. त्यामुळे महाराष्ट्रात तशी कोणतीही परिस्थिती नाही, त्यामुळे एकाद्या मंत्र्याला अटक झाली, कोणत्याही मंत्र्यावर गुन्हा नोंदवला ही कारणं राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लागू नसतात. त्यामुळे महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याची परिस्थिती आहे असं वाटत नाही असंही असीम सरोदे यांनी मत व्यक्त केले. एकाद्या मंत्र्यावर आरोप झाले आणि त्यांना अटक झाली तरीही सरकार कोसळण्याची किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नसते असे मत व्यक्त करुन राज्यात राष्ट्रपती लावणं शक्य नाही.

Published on: Feb 24, 2022 11:50 PM