Jalindra Supekar : सुपेकरांवर ‘हे’ 6 मोठे आरोप अन् 550 कोटींची खडंणीही मागितली
आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा लागतात. जालिंदर सुपेकर यांच्यावरही सहा मोठे आरोप करण्यात आले आहेत.
जालिंदर सुपेकर यांच्यावर ५५० कोटी रूपये मागितल्याचा मोठा आरोप करण्यात येत आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर ५५० कोटी रुपये मागितल्याचा आरोप असून अमरावतीमधील कैद्याचा वकील निवृत्ती कराड यांनी सुपेकर यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. यासह जालिंदर सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सुपेकरांवरील हे सहा मोठे आरोप
कैदी गायकवाडांकडून जालिंदर सुपेकरांनी ५५० कोटींची खडंणी मागितली, असं कैद्याचा वकील निवृत्ती कराड यांनी म्हटलंय
हगवणे यांना पिस्तुलाचा परवाना देण्याचा आरोप आहे.
गायकवाड यांचं सोनं जप्त करताना १५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही कराड यांनी केलाय.
कैद्यांकडे ३०० कोटी मागितले असल्याचा आरोप भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलाय.
कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार केल्याचा राजू शेट्टी यांनी आरोप केलाय.
वादग्रस्त मेव्हणे पीआय शशिकांत चव्हाण यांचं प्रमोशन केल्याचा आरोप होतोय.
