Jammu & Kashmir Blast: जम्मू-काश्मीरच्या नैगाममध्ये अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट, नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात फरिदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 28 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. फॉरेन्सिक पथक नमुने घेत असताना हा स्फोट झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे, तपास सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील नौगाम परिसरात एका पोलीस ठाण्यात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरिदाबादमधून जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट नौगाम पोलीस ठाण्यात होते आणि फॉरेन्सिक पथक त्याचे नमुने घेत असताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट अमोनियम नायट्रेटमुळे झाला.
काही सूत्रांनी आयईडी (IED) फुटल्याने अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याचे सांगितले आहे. PAFF संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असली तरी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस महासंचालक (DGP), महानिरीक्षक (IGP) आणि उपमहानिरीक्षक (DIG) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत एसओपी (SOP) चे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, याचा तपास सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
