Jayant Patil : जयंत पाटलांकडून राजीनाम्याचे संकेत, केलं मोठं विधान, मला मोठी संधी दिली आता नव्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन १० जून रोजी पुण्यात साजरा होतोय. वर्धापन दिनानिमित्त होत असलेला मेळावा हा आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शनच ठरत आहे. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत.
पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. तर दुसरीकडे माझ्याकडे कोणतंही पद नाही, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. ‘शरद पवारांनी मला मोठी संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी देणं आवश्यक आहे. यानिमित्ताने एक विनंती आहे, पक्ष पवारांचा आहे. त्यामुळे शरद पवार योग्य निर्णय घेतील. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे.’, असं जयंत पाटील म्हणाले.
Published on: Jun 10, 2025 12:47 PM
