प्रत्यक्षात BJP चं संख्याबळ 70 ते 80 आमदारांपेक्षा जास्त नाही : जयंत पाटील
आम्ही भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सामना करतोय. भाजप सर्वत्र असताना तो मजबूत आहे असं नसल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
आम्ही भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सामना करतोय. भाजप सर्वत्र असताना तो मजबूत आहे असं नाही. शिवसेनेमुळं भाजप वाढली. 2014 ला मोदींच्या लाटेवर निवडून आले. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पक्षांतर केलं. त्यापैकी 20 ते 25 जण निवडून आलेले आहेत. त्यामुळं भाजपचं संख्याबळ हे 70 ते 80 पेक्षा जास्त नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. जयंत पाटील यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.
