Pune | पुण्यातील ध्रुवी पडवळने फ्रेंडशिंप शिखरावर केली यशस्वी चढाई

Pune | पुण्यातील ध्रुवी पडवळने फ्रेंडशिंप शिखरावर केली यशस्वी चढाई

| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 4:29 PM

पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केलीय. यावेळी तिने हुतात्मा बाबू गेनू यांना मानवंदना दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.

पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केलीय. यावेळी तिने हुतात्मा बाबू गेनू यांना मानवंदना दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष देखील केला. पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केलीय. यावेळी तिने हुतात्मा बाबू गेनू यांना मानवंदना दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. ही मोहीम लहू उघडे यांच्या नेतृत्वाखाली आखली गेली होती, त्यामध्ये ध्रुवी पडवळ पुणे या आठ वर्षाच्या मुलीचा सहभाग होता.

तब्बल 17,352 फूट उंची असलेल्या शिखरावर चढाई करण्यासाठी ध्रुवी आणि टीम पुण्यातून 2 सप्टेंबर ला निघालेले होते आणि 9 सप्टेंबर रोजी 15420 फूट सुरक्षितरित्या सर करून खाली आले. उर्वरित 589 फूट उंचीची चढाई खराब हवामानामुळे थांबवावी लागली. ध्रुवीने यापूर्वी कळसुबाई शिखर देखील सर केले आहे. ज्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती.