Jyoti Malhotra : हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं, 14 दिवस मुरीदकेमध्ये राहिली, हिसार पोलिसांना ज्योती मल्होत्राने दिली मोठी कबुली

Jyoti Malhotra : हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं, 14 दिवस मुरीदकेमध्ये राहिली, हिसार पोलिसांना ज्योती मल्होत्राने दिली मोठी कबुली

| Updated on: May 19, 2025 | 7:00 PM

Jyoti Malhotra espionage training : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय असलेल्या ज्योती मल्होत्राने मुरीदकेमध्ये 14 दिवस प्रशिक्षण घेतलं असल्याची कबुली दिली असल्याचं हिसार पोलिसांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्योती मल्होत्राने लष्कर ए तैयबाचं अस्तित्त्व असलेल्या मुरिदके येथे जाऊन चक्क 14 दिवस हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं असल्याचं उघड झालं आहे. आज एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स तिची चौकशी करणार आहे. मुरिदके इथं दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर ए तैयबा दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे. ज्योती मल्होत्रा हिने याच ठिकाणी एकूण 14 दिवस होती. या काळात तिने हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जातंय. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली आहे.

दरम्यान, भारतात हरियाणा आणि पंजाबसह एकूण तीन राज्यांत पाकिस्तानी हेरांचं जाळं पसरलेलं आहे.  तीन राज्यांतून एकूण 11 दिवसांत भारताच्या तपास संस्थांनी एकूण 12 हेर पकडले आहेत. या सर्वच हेरगिरांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Published on: May 19, 2025 07:00 PM