Kangana Ranaut : राजकीय फायद्यासाठी….हिंदी-मराठी वादावर कंगना रणौत स्पष्टच बोलली, साधला ठाकरे बंधूंवर निशाणा?

Kangana Ranaut : राजकीय फायद्यासाठी….हिंदी-मराठी वादावर कंगना रणौत स्पष्टच बोलली, साधला ठाकरे बंधूंवर निशाणा?

| Updated on: Jul 10, 2025 | 12:48 PM

'सर्वजण आपल्याच देशाचा एक भाग आहेत. आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे. ', असं स्पष्ट मत व्यक्त करत कंगना रणौतने हिंदी-मराठी वादावर बोलताना ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय.

अभिनय क्षेत्रातील क्वीन कंगना रणौत हिने राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतल्यानंतर ती तिच्या प्रत्येक वक्तव्यानं चर्चेत असते. कोणत्याही विषयावर कंगना रणौत आपलं मत निर्भीडपणे सोशल मीडिया किंवा थेटपणे मांडताना दिसते. सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंदी मराठीच्या भाषा वादात कंगना रणौतने आता उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे, असं म्हणत कंगना रणौतने आपलं मत व्यक्त केलं आहे. काही लोकांकडून राजकीय फायद्यासाठी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र महाराष्ट्रात लोकं खूप प्रेमळ असतात असं म्हणत कंगना रणौतनं ठाकरे बंधूंवर ही टीका केली आहे.

‘महाराष्ट्रीयन लोक खूप प्रेमळ असतात. अगदी आपल्या साध्या आणि निरागस हिमाचली लोकांसारखे… काही लोकं राजकीय फायद्यासाठी समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपली एकता विसरता कामा नये. मग ते महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारतातील लोकं असोत किंवा इतर कुठलेही…’, असं कंगना रणौत म्हणाली.

Published on: Jul 10, 2025 12:48 PM