Special Report | 3 तास 20 मिनिटांत राज ठाकरे यांचा यू-टर्न?,कर्नाटक निवडणुकीत मनसेची भूमिका काय?

Special Report | 3 तास 20 मिनिटांत राज ठाकरे यांचा यू-टर्न?,कर्नाटक निवडणुकीत मनसेची भूमिका काय?

| Updated on: May 09, 2023 | 8:33 AM

VIDEO | कर्नाटक निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय? 'ते' ट्वीट केलं अन् लगेच डिलीट केलं...? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटक निवडणुकीवर एक ट्विट केलं. कर्नाटक निवडणुकीत मराठी उमेदवारांना मत द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केलं पण महाराष्ट्र एकीकरण समितीने टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी हे ट्वीट डिलीट केलं. राज ठाकरे सकाळी म्हणाले, कुठल्याही पक्षाला मतदान करा पण उमेदवार मराठीच हवा. अन् दुपारी म्हणाले महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मतदान करा. अवघ्या 3 तास 20 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतलाय. सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी राज ठाकरे यांनी ट्वीट केलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मेवा मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू भगिनींना माझं आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेना पण तो मराठी असायला हवा. आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायला हवीच… हे ट्वीट राज ठाकरे यांनी डिलीट केलं…बघा असं काय घडलं की राज ठाकरे यांनी ते ट्वीट डिलीट करावं लागलं…बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 09, 2023 08:26 AM