Karuna Sharma : ‘…ही सवय खूप घाण’, क्रूर औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांनी गंभीर आरोप करत केला खळबळजनक दावा
करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच मुंबई सत्र न्यायालयाने काल ही मोठी टिप्पणी केली. यासह दोघांनी दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
‘औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगची आहे’, असं म्हणत करूणा शर्मा यांनी खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे लग्नासाखेच असल्याचे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर करुणा शर्मा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आपली प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँग इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खून करताय, स्वतःच्या पत्नीला जिला दोन मुलं आहे, तिच्यावर अत्याचार करत आहेत. एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याची सीमा असते पण यांना कोणतीही मर्यादा नसल्याचे म्हणत करूणा शर्मा यांनी मुंडे आणि गँगवर आरोप केलेत. पुढे त्या असंही म्हणाल्या, “माझ्या आईने आत्महत्या केलेली आहे. मी 2008 साली वीष प्राशन केलं होतं. त्यानंतर मी पाच दिवस मी सीएचएल अपोलो रुग्णालयात भरती होते. माझ्या बहिणीसोबतही बलात्कार झालेला आहे. आज माझ्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे, त्याच पद्धतीने माझ्या आईवरही दबाव टाकला होते. याच दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली होती,” असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला.
