Karuna Sharma : मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; मला अजूनही हिंसा सुरूच आहे; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
Karuna Sharma Serious Allegations : करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात बांद्रा न्यायालयात धाव घेतली आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात बांद्रा न्यायालयात धाव घेतली आहे. करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे.
यावेळी बोलताना करुणा शर्मा यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत. करुणा शर्मा म्हणाल्या की, मला 2 लाख पोटगी मिळाली, तेव्हापासून आणि आमदारकी रद्द होणार असं कोर्टाकडून नोटीस देण्यात आली, तेव्हापासून मला धमक्या येत आहेत. स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरुच आहे, यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाॅट्सॲप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत, पोलिस तक्रार दाखल करतात. मात्र काही करत नाही. दबावतंत्र धमकी देण्याचे काम करत आहे, बहिणीवर बोलत आहे, म्हणून मला धनंजय मुंडेंनी धमकी दिली असल्याचं देखील करुणा शर्मा यांनी सांगितलं.
