Khopoli Case : वडिलांचा शेवटचा चेहराही पाहू शकले नाही, मारेकऱ्यांना… मंगेश काळोखे यांच्या मुलींची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया

Khopoli Case : वडिलांचा शेवटचा चेहराही पाहू शकले नाही, मारेकऱ्यांना… मंगेश काळोखे यांच्या मुलींची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया

| Updated on: Jan 03, 2026 | 2:06 PM

मंगेश काळोखे यांच्या खुनींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांची कन्या वैष्णवी काळोखे यांनी केली आहे. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे गौरव महाजन यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती दिली. तर साताऱ्यातील कराडच्या पालीमध्ये खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यासह यात्रा उत्साहात सुरू झाली असून, लाखो भाविकांनी जय मल्हारचा गजर केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खोपोलीत शिवसेने शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. खोपोली प्रकरणातील मंगेश काळोखे यांच्या हत्येबाबत त्यांची कन्या वैष्णवी काळोखे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. समाजसेवा करणे हाच त्यांच्या वडिलांचा गुन्हा होता का, असा प्रश्न वैष्णवीने उपस्थित केला. न्याय न मिळाल्यास लोकांना रस्त्यावर जाण्याची भीती वाटेल, असे मत तिने व्यक्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळेखे मुलाला शाळेत सोडून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

Published on: Jan 03, 2026 02:06 PM