किरण सामंत लोकसभा लढणार? संभाव्य उमेदवारीवर उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य
VIDEO | किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात चर्चा, सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारीवर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय केलं भाष्य?
रत्नागिरी , २६ ऑगस्ट २०२३ | किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला तर महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत, शिंदे गटाकडून किरण सामंत आणि भाजपाकडून निलेश राणे यांच्या नावाची चर्चा रत्नागिरीमध्ये होताना दिसतेय. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या लोकसभा जागेसंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं भाष्य केले आहे. उदय सामंत म्हणाले, किरण सामंत हे माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र त्यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण ते निवडणुकीला उभे राहिले, तर आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना तीन ते साडेतीन हजार मतांनी निवडून आणू, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केलाय.
Published on: Aug 26, 2023 11:25 PM
