Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट विलासराव देशमुख यांचं घराणं

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट विलासराव देशमुख यांचं घराणं

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 3:54 PM

लातूर मधील साखर करखान्याच्याव्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

लातूर: भाजप नेते किरीट सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्येही किरीट सोमय्यांनी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन अजित पवारांवर आरोप केले. मात्र, लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहा केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी यानिमित्तानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस नेत्यांकडं मोर्चा वळवला आहे. लातूर मधील साखर करखान्याच्याव्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली, असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.