Breaking | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, प्रवीण दरकेर, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 19, 2021 | 8:22 PM

बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता राहिलेले नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई : नारायण राणे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यांना बाळासाहेबांच दर्शन घेऊ वाटलं त्यामुळे आम्ही विरोध केला नाही पण अभिवादन केल्यानंतर लगेचच बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर टीका करण योग्य नाही. ही शिवसैनिकांची भावना आहे. त्यांनीही तस वागायला हवं, अशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुद्धीकरणावर जोरदार टीका केली आहे. विनाशकाळे विपरीत बुद्धी… खरं तर नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आले असता विरोध होता कामा नये. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या हाताखाली घडलेला कार्यकर्ता आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनाही आनंदच झाला असता. मला वाटतं अशा प्रकारच्या मानसिकतेमुळं शिवसेना सहानुभूती मिळवण्यापेक्षा सहानुभूती गमावत आहे. अशी कृती सर्वसामान्य माणसाला किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता राहिलेले नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.