Video : मानेचा त्रास असणारा रुग्ण मान वर कसा करू शकतो?- किशोरी पेडणेकर

| Updated on: May 09, 2022 | 2:29 PM

इकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शिवसेना नेत्यांच्या तक्रारीसाठी दिल्लीकडे रवाना झाले आणि शिवसेना नेत्यांनी लिलावतीकडे (Lilavati hospital) धाव घेतली. लिलावती रुग्णालयात रविवारी नवनीत राणा यांचं MRI झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. थेट एमआरआय मशीनवर गेलेली व्यक्ती अशा प्रकारे मान उचलून काय बघते? त्या तपासणी रुममध्ये कुणीतरी त्याचा व्हिडिओ काय काढतो? आणि एमआरआय झालेली […]

Follow us on

इकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शिवसेना नेत्यांच्या तक्रारीसाठी दिल्लीकडे रवाना झाले आणि शिवसेना नेत्यांनी लिलावतीकडे (Lilavati hospital) धाव घेतली. लिलावती रुग्णालयात रविवारी नवनीत राणा यांचं MRI झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. थेट एमआरआय मशीनवर गेलेली व्यक्ती अशा प्रकारे मान उचलून काय बघते? त्या तपासणी रुममध्ये कुणीतरी त्याचा व्हिडिओ काय काढतो? आणि एमआरआय झालेली व्यक्ती, मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या नवनीत राणा लिलावतीच्या बाहेर येऊन माध्यमांना एवढी सविस्तर प्रतिक्रिया देतात. कित्येक तास माध्यमांसमोर बोलत राहतात, हे कसं होऊ शकतं? या प्रश्नांची पोतडी घेऊन शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि आमदार मनिषा कायंदे आज लिलावती रुग्णालयात पोहोचल्या. लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत पेडणेकर आणि मनिषा कायंदेंनी नवनीत राणांना एमआयआरवरून अक्षरशः उघडं पाडलं. राणांचा एमआरआय झाला की नाही? या मूळ प्रश्नापासूनच शिवसेनेच्या प्रश्नांना सुरुवात झाली. मानेचा त्रास असणारा रुग्ण मान वर कसा करू शकतो?,असाही सवाल यावेळी किशोरी पेडणेकर यांनी विचारला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. गंभीर बाब म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देताना रुग्णालय प्रशासनाची भंबेरी उडाली.