लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर…. एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात एका तरुण विवाहित महिलेच्या निधनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अस्मिता काटकर असे या महिलेचे नाव असून त्यांच्या मागे अवघ्या एका महिन्याची मुलगी आहे. विशेष म्हणजे घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी बारशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्याची तयारी केली होती. यासाठी तब्बल 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन मागवण्यात आला होता. मात्र, आनंदाच्या वातावरणावर अचानक दुःखाचे सावट पसरले.
या प्रकरणानंतर अस्मिता यांच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच बाळाच्या जन्मापूर्वीच मुलासाठी कपडे खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अस्मिता यांना मुलगी झाल्यानंतर त्रासाचे प्रमाण वाढल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे.