Kolhapur News : गोकुळच्या अध्यक्ष पदावरुन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच; बंद लिफाफ्यात कोणाचं नाव?

Kolhapur News : गोकुळच्या अध्यक्ष पदावरुन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच; बंद लिफाफ्यात कोणाचं नाव?

| Updated on: May 30, 2025 | 2:03 PM

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना यावरून नेत्यांमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे.

कोल्हापुरात गोकुळ अध्यक्ष निवडीचा नवा अंक बघायला मिळतो आहे. गोकुळच्या अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये आता चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. तर नव्या अध्यक्षपदासाठी नाविद मुश्रीफ यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. आज दुपारी यासंदर्भातली बैठक होणार आहे. दरम्यान अध्यक्ष निवडीच्या बैठकीपूर्वी सत्ताधारी संचालकांची देखील पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे.

गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना अध्यक्ष कोण? याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज दुपारी 3 वाजता याबाबत बैठक पार पडणार असून याच बैठकीत गोकुळच्या हण्या अध्यक्षांचं नाव समोर येणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी आज नेत्यांची सुद्धा एक बैठक पार पडली. त्यामुळे आता अध्यक्ष निवडीसाठी जोरदार रस्सीखेच असल्याचं बघायला मिळत आहे.

Published on: May 30, 2025 02:03 PM