कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल; अधिक महिन्याला भावकीत केली तुफान हवा!
आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढते सोन्या-चांदीचे दर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले होते. सोनं-चांदी खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलची बचत करा आणि परदेश प्रवास कमी करा, असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातून एक अनोखी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे.

हिंदू धर्मातील महत्त्वाचा अधिक मास सुरू होताच कोल्हापुरातील एका सासऱ्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. या चप्पलीची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापुरातील कारागीर विक्रांत माळी यांनी ही विशेष चप्पल तयार केली आहे. पारंपरिक लेदर कोल्हापुरी चप्पलीच्या धर्तीवर चांदीचे विविध भाग तयार करून आठ दिवसांत ही चप्पल बनवण्यात आली. जावयाला परदेशात राहूनही कोल्हापूरची आठवण रहावी, या उद्देशाने ही खास भेट तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अनोख्या चांदीच्या चप्पलीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.