Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… योजनेच्या वेबसाईटमध्ये मोठे बदल! कोणत्या महिलांना फायदा? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… योजनेच्या वेबसाईटमध्ये मोठे बदल! कोणत्या महिलांना फायदा? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

| Updated on: Nov 13, 2025 | 1:29 PM

आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाल्याची माहिती दिली. विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी वेबसाईटमध्ये आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेतून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एक कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच, पती गमावलेल्या किंवा घटस्फोटित महिलांसारख्या एकल महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात येत असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया सुरू असून, कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचे पर्याय वेबसाईटवर तयार केले जात आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या महिलांनी कागदपत्र गमावली आहेत, त्यांना मुदतवाढ दिली जाईल.

Published on: Nov 13, 2025 01:29 PM