Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… आता 2100 रूपये मिळणार पण…. महायुतीचे मंत्री उदय सामंत बघा काय म्हणाले?
राज्यात महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना १५०० रूपये दर महिन्याला दिले जातात. निवडणुकीच्या दरम्यान, सरकारने विजयी झाल्यास त्याचे २१०० रूपये करणार असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप महिलांना ते देण्यात आले नाही.
‘महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन नक्की सहानभुतीपूर्वक विचार करेल.’, असा शब्द देताना मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केले. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना १५०० रूपये दिले जातायत. मात्र १५०० ऐवजी २१०० रूपये कधी मिळणार याकडे साऱ्या महिला वर्गाचे लक्ष लागून आहे. दरम्यान विरोधक देखील सातत्याने महायुती सरकारला यासंदर्भात विचारणा करताना दिसतात. अशातच मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रूपये कधी देण्यात येणार यासंदर्भात वक्तव्य केले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रूपये देण्यासंदर्भात सध्या वर्किंग सुरू आहे. ज्यावेळी यासंदर्भात निर्णय घ्यायची वेळ येईल, त्यावेळी महाराष्ट्र सरकार नक्की निर्णय घेईल’, असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी कोणतीही विशिष्ट तारीख सांगितली नसल्याचे पाहायला मिळाले. यावरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
