लालबागच्या राजाचा तराफा ‘मेड इन ठाणे’? थेट निर्मात्यांनीच सांगितलं सत्य
लालबागच्या राजाच्या विसर्जनातील आधुनिक तराफा ठाण्यातील वाघळे इंडस्टेटमध्ये बनवला गेला आहे. सोशल मीडियावर या तराफ्याबाबत गुजरातशी संबंध जोडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तराफा निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की हा तराफा 2016 पासून वापरला जात असून तो ठाण्यातच तयार करण्यात आला आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तराफ्याबाबत अलीकडेच सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. काही मंडळींचा असा दावा होता की हा तराफा गुजरात राज्यातून आणण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा ठरला आहे. ठाण्यातील वाघळे इंडस्टेटमधील निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की हा तराफा त्यांच्याकडे २०१६ पासून आहे आणि तो त्यांनीच डिझाइन करून बनवला आहे. त्यांनी २०१६ मध्ये लालबागच्या राजाच्या मंडळासाठी २० फूट बाय २० फूटचा तराफा आणि विसर्जनासाठी सोयीस्कर सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा तराफा मॉड्युलर डिझाइनचा असून तो दर वर्षी गिरगाव चौपाटीला नेऊन असेंबल केला जातो. भरती-ओहोटीच्या तडाख्यामुळे विसर्जन प्रक्रिया बारा तासांनी उशीरा झाली.
Published on: Sep 11, 2025 09:34 AM
