Jalgaon | शहीद जवान निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप

Jalgaon | शहीद जवान निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 1:30 PM

शहीद वीर जवान  निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला आहे. सर्वांनी जवान निलेश यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि साश्रू नयनांनी या वीराला शेवटचा निरोप दिला.

शहीद वीर जवान  निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला आहे. सर्वांनी जवान निलेश यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि साश्रू नयनांनी या वीराला शेवटचा निरोप दिला.  3 जून रोजी निलेशचा वाढदिवस होता, आपल्या कर्तव्यावर बर्फ़ाळ भागात काश्मीर मधील लद्दाख येथे असतांना त्यांच्या मित्रानी बर्फ़ाचा केक बनवून वाढदिवस साजरा केला होता, हा व्हिडीओ पण व्हायरल झाला होता.  थोरल्या भावाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा दादा सीमेवर काय ,कसला केक आमचं काय, नोकरी अशी की आज आहे तर उद्या नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.  3 तारखेला त्याने परिवाराशी साधलेला संवाद अखेरचा होता.