Latur Farmer : पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् कशाची पर्वा न करता मुंबईच्या दिशेनं पायपीट; व्यथा नेमकी काय?
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते मंत्रालय पायी चालणाऱ्या सहदेव होणाळे यांना ठाणे जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज देताच पुन्हा त्यांनी नांगरासकट पदयात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र ठाणे वागळे पोलिसांनी त्यांना ॲम्बुलन्समध्ये बसून मुंबईच्या दिशेने नेत आझाद मैदानावर सोडण्याचा निर्णय घेतला.
गेल्या 12 दिवसापासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते मंत्रालय खांद्यावरती नांगर घेऊन पायी चालणारे सहदेव होणाळे हे पायी चालत आंदोलन करत आहे. सहदेव होणाळे यांना काल ठाणे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर मुंबई पोलिसांसह पोलीस व्हॅनमधून आझाद मैदान या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. कर्जमाफी, शेतीला हमीभाव, सातबारा कोरा अशा विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सहदेव होणाळे हे पायी चालत आलेले आहेत. सहदेव होणाळे हे मुंबईत देखील नांगर घेऊन चालणार होते मात्र त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली. पायी चालत आल्यामुळे सहदेव होणाळेंच्या पायाला मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी गणेश सूर्यवंशी देखील आहेत.
Published on: Jul 16, 2025 02:48 PM
