Amol Mitkari : अमोल मिटकरी-लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली; तोच खरंच मर्द असेल तर.., मिटकरींचा थेट इशारा

Amol Mitkari : अमोल मिटकरी-लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली; तोच खरंच मर्द असेल तर.., मिटकरींचा थेट इशारा

| Updated on: Jun 02, 2025 | 6:28 PM

Laxman Hake Vs Amol Mitkari : अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टिकेनन्यत्र आता अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालेलं बघायला मिळत आहे.

लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील हाके यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे हाके आणि मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपलेली बघायला मिळत आहे. यावेळी टीका करताना हाके यांनी मिटकरी यांचा उल्लेख माकड असा केला तर मिटकरी यांनी हाके यांना 12 छिद्राचा पाना असं म्हंटलं आहे. हाके यांच्याकडे असलेल्या फॉरच्युनर गाडीवरून देखील मिटकरी यांनी शंका उपस्थित केली आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले की, अजितदादांवर टीका करावी, एवढी त्याची औकात नाही. आमच्यावर हल्ला चढवायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. आमच्या एका गालावर वाय आणि दुसऱ्या गालावर झेड काढणार म्हणतो. तो गालाची काय भाषा करतो. तोच खरंच मर्द असेल तर तो सांगेल त्या ठिकाण, सांगेल ती तारीख.. विदाऊट सेक्युरिटी. त्याने माझ्या शर्टच्या बटनाला जरी हात लावावा.. तरी त्याचा पार्श्वभाग वायझेड करणार, असा थेट इशाराच मिटकरी यांनी आता दिलेला आहे.

Published on: Jun 02, 2025 06:25 PM