विधिमंडळाच्या समित्या जाहीर पण भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, अजितदादांनी का डावललं?

विधिमंडळाच्या समित्या जाहीर पण भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, अजितदादांनी का डावललं?

| Updated on: Mar 28, 2025 | 12:17 PM

विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विविध आमदारांची वर्णी लागली आहे. मात्र धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतेय.

राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आहे. विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं कळतंय. राष्ट्रवादीच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मात्र माजी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना एकाही समितीत नेमणूक करण्यात आलेला नाही. अजित दादांनी वादग्रस्त असलेल्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना लांब ठेवण्यात आल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात होतेय. दोन दिवसांपूर्वीच विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्याच्या माहिती आहे. विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये विविध समिती प्रमुख आणि समिती प्रमुख म्हणून विविध आमदारांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळतंय. मात्र राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील दोन महत्त्वाच्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं दिसतंय.

Published on: Mar 28, 2025 12:17 PM