आधी सुप्रीम कोर्ट मग निवडणूक आयोग, निकालासंदर्भात कायदेतज्ञ यांचं स्पष्ट मत काय?

| Updated on: Jan 17, 2023 | 12:49 PM

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबतच्या निर्णयाची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर होणार आहे. पण, सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणी पार पडल्यानंतरच निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी असं स्पष्ट मत कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांच्याकडे निवडून आलेल्या लोकांची संख्या जास्त दिसत आहे. पण, पक्ष पदाधिकारी यांची संख्या जास्त कुणाकडे दिसत असेल तर ती उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांच्याकडे दिसते. दोन्हीकडील बाजू ऐकल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय देईल. ज्या गटाला मान्यता मिळेल त्यालाच चिन्ह मिळेल.

ज्यावेळी निर्णय होत नाही त्यावेळी चिन्ह दिले जात नाही. पण, उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या या प्रकरणात निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये. सर्वोच्च न्यायालयात १६ अपात्र आमदारांचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणता निर्णय घेतल्यास तो हास्यास्पद ठरेल.

१६ अपात्र आमदार अपात्र ठरले तर उरलेलेही अपात्र ठरतात. मग, शिवसेना पक्ष कुणाचा ठरणार? त्यामुळे आधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला पाहिजे. आपला विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास नाही हे दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले.